137 अहवाल प्राप्त; 18 पॉझिटीव्ह, 58 डिस्चार्ज, चार मयत

 अकोला,दि.19 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 137 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 119 अहवाल निगेटीव्ह तर  18 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3331(2776+555) झाली आहे. आज दिवसभरात 58 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 24319 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23607, फेरतपासणीचे 173 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  486  नमुने होते. आजपर्यंत एकूण 24186 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21410 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3331(2776+555) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 18 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील पाच जण, बार्शिटाकळी येथील दोन जण तर उर्वरित गौरक्षण रोड, गायत्री नगर, पिंजर ता.बार्शिटाकळी, राजणखेड ता.बार्शिटाकळी, हातगाव ता. मुर्तिजापूर व बेलखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भीम नगर, डाबकी रोड, अकोट व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात गुलजारपुरा येथील 35 वर्षीय स्त्री असून ती दि. 16 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, कोठारी पैलपाडा येथील 65 वर्षीय पुरुष असून तो दि. 10 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, बेलखेड, ता. तेल्हारा येथील 82 वर्षीय पुरुष असून तो दि. 17 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर रायखेड, ता.तेल्हारा येथील 70 वर्षीय पुरुष असून तो दि. 16 जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

58 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17 जणांना, कोविड केअर सेंटर येथून तीन जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजीन्सी येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 22 जण तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून आठ जणांना अशा एकूण 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

373 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3331(2776+555)  आहे. त्यातील  141 जण मयत आहेत. स्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2817 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 373 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ