203 अहवाल प्राप्त; 45 पॉझिटीव्ह, 18 डिस्चार्ज


अकोला,दि.24 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 203 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 158 अहवाल निगेटीव्ह तर  45 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3520(2935+585) झाली आहे. आज दिवसभरात 18 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 25941 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 25261, फेरतपासणीचे 174 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 506  नमुने होते. आजपर्यंत एकूण 25788 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 22853 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3520(2935+585) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 45 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 45 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 20 महिला व 25 पुरुष आहे. त्यात तेल्हारा येथील 13 जण, चांगेफळ येथील 10 जण, बाळापूर येथील सात जण, म्हैसपूर येथील चार जण, बोरगाव मंजू येथील दोन जण, तर उर्वरित जवाहरनगर, चांदूर, कान्हेरी गवळी, डाबकी रोड, कावसा, देशमुख फैल, गोरेगाव, पोपटखेड व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

18 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 जणांना, कोविड केअर सेंटर येथून दोन जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक जण, तर कोविड केअर सेंटर  बार्शीटाकळी येथून दोन जणांना अशा एकूण 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

354 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3520(2935+585) आहे. त्यातील  144 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3022 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 354 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ