कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांची गती वाढवा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

 

        अकोला,दि.11 (जिमाका)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  जिल्ह्यात विशेष मोहिमेव्दारे अधिकाधिक स्वॅब घेवून कोरोना तपासणीची गती वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

            आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोरोनाच्या संदर्भांत आढावा घेताना, ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, नोडल अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, संदिप गावंडे, गजानन मुर्तळकर यासह वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.

            जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहे. कोरोनाचा रुग्ण उशीरा रुग्णालयात पोहचत असल्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होवून त्याचा मृत्यू होण्याचा धोका संभावत आहे. हे सर्व टाळण्यासाठी विशेष मोहिम राबवून झोन निहाय अधिकाधिक स्वॅब संकलन करुन  कोरोना चाचण्याची गती वाढवावी. यामुळे वेळीच उपचार होवून मृत्यूचे प्रमाण आटोक्यात येवू शकते, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी विशेष करुन किराणा दुकान, भाजी विक्रेते, सलून आदी ठिकाणी संसर्ग फैलाव होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी दुकानदारांनी स्वंयस्फुर्तीने कोरोना चाचण्या करुन घ्याव्यात, असे  आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून कोरोना फैलाव रोखण्यासाठी त्याच्याही चाचण्या त्वरीत कराव्या, असेही निर्देश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ