रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 424 चाचण्या, 47 पॉझिटिव्ह
अकोला,दि. 4 (जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 424 चाचण्यामध्ये 47 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या
याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर
व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाहीत. अकोट येथे 38 चाचण्या झाल्या त्यात
कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, बाळापूर येथे 241 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
बार्शीटाकळी येथे पाच
चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही, मुर्तिजापूर येथे 36 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह आला. तसेच
अकोला मनपामध्ये 86 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 18
जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात चाचण्या झाल्या नाही, असे एकूण 424 चाचण्या होऊन त्यात 47 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 8272 चाचण्या झाल्या असून 422
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा