उघड्यावर मांस विक्रीस बंदी

 

            अकोला,दि.16 (जिमाका)-  आगामी काळात विविध धार्मिक सण तसेच सध्या होत असलेल्या संततधार पाऊस हे लक्षात घेता जिल्ह्यात उघड्यावर मांस विक्री करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बंदी केली आहे.

            सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे उघड्यावर मांसविक्री केल्यामुळे त्याव्दारे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धार्मिक सण, उत्सव या काळात विविध धार्मिक भावनाचा आदर राखता, उघड्यावर मांसविक्री होणार नाही, याची खबरदारी संबंधित महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम