खते खरेदीसाठी वापरा डिजीटल पेमेंट पद्धती -जिल्हा कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

 अकोला,दि.२८(जिमाका)- खतांचे विक्री व्यवहार सुरळीतपणे व्हावेत यासाठी  जिल्ह्यातील खत विक्रेते  तसेच शेतकरी बांधवांनी खते खरेदी विक्री करतांना डिजीटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  पिकांसाठी खतांची खरेदी करतांना शेतकऱ्यांकडून कॅशलेस/ डीजीटल पेमेंट प्रणालीचा अवलंब करण्यात यावा असे निर्देश केंद्रीय रसायन व खते मंत्रालय तसेच कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत.  खत विक्री संदर्भातथेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडून  पॉस (POS) द्वारे अनुदानित खताची विक्री करणे सोईचे झाले आहे.  त्यामुळे खतांचा पुरवठा हंगामानुसार सुनियोजित  पद्धतीने करण्यात येत आहे.  खतांची विक्री व्यवहार सुरळीतपणे सुरु रहावी यासाठी  राज्यातील सर्व खत विक्रेत्यांकडे खते विक्रीसाठी कॅशलेस/ डिजीटल पेमेंट प्रणाली लागू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  त्यानुसार जिल्ह्यातील खत विक्रेते  तसेच शेतकरी बांधवांनी खते खरेदी विक्री करतांना डिजीटल पेमेंट पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषि विकास अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ