451 अहवाल प्राप्त; 16 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, 2 मयत

अकोला,दि.12 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 451 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 435 अहवाल निगेटीव्ह तर  16 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3124(2627+497) झाली आहे. आज दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 547 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 22837 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 22226, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  442  नमुने होते. आजपर्यंत एकूण 22742 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 20115  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3124(2627+497) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 16 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व 13 पुरुष आहेत. त्यातील केळकर हॉस्पीटल येथील दोन जण तर उर्वरित गिता नगर, कापसी, जीएमसी, मुर्तिजापूर, भिम नगर, मोठी उमरी, कौलखेड, कृषि नगर, निमकर्दा, जठारपेठ, सस्ती, कोठारी व वाघाडी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष असून  ते निमकर्दा, अकोला येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सात जण तर ऑयकॉन हॉस्पीटल येथून दोन जणांना अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत

दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात वंजारीपुरा, बार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष असून तो दि. 11 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील 48 वर्षीय महिला असून ती दि. 1 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

 

547 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3124(2627+497) आहे. त्यातील  119 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2458 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 547 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ