पंतप्रधानांनी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला केले संबोधन




अकोला,दि.1(जिमाका)-  पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (दि.1) रोजी आयोजित जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. याची घोषणा करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी व केंद्रीय राज्यमंत्री संजयजी धोत्रे यांनी आज सांगितले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 (सॉफ्टवेअर) चा ग्रँड फिनाले 1 ते 3 ऑगस्ट, 2020 दरम्यान आयोजित केला जाईल. हे हॅकेथॉन मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि आय फोर सी यांनी आयोजित केले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन विषयी आयोजित उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले आणि यापूर्वी आयोजित केलेल्या हॅकेथॉनच्या कामगिरीविषयी चर्चा केली. या बैठकीला उच्च शिक्षण सचिव अमित खरे, एआयसीटीई चे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, अतिरिक्त सचिव, एमएचआरडी राकेश रंजन आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी, एमएचआरडी अभय जेरे उपस्थित होते.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा आपल्या देशासमोरची आव्हाने सोडविण्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञान नवकल्पना ओळखण्यासाठी एक खास उपक्रम आहे असे केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले. ही एक निरंतर सुरु राहणारी डिजिटल उत्पादन विकास स्पर्धा आहे, जिथे तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधण्यासाठी नवनवीन आव्हाने दिली जातात. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांसमोर असलेल्या आव्हानांवर काम करण्याची संधी मिळते, ज्यासाठी ते चौकटी बाहेरील आणि जागतिक दर्जाचे निराकरण देऊ शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना