रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १३४ चाचण्या, नऊ पॉझिटिव्ह


अकोला,दि.३० (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १३४ चाचण्या झाल्या त्यात  नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर बार्शीटाकळी येथे दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोला मनपा येथे ९६ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर ३१ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात १३४ चाचण्यांमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत १२५७१ चाचण्या झाल्या त्यात ७३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन