215 अहवाल प्राप्त; 31 पॉझिटीव्ह, 64 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.18 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 215 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 184 अहवाल निगेटीव्ह तर  31 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3290(2758+532) झाली आहे. आज दिवसभरात 64 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 24172 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23520, फेरतपासणीचे 173 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  479  नमुने होते. आजपर्यंत एकूण 24049 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21291 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3290(2758+532)  आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 31 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील रिधोरा बाळापूर येथील सहा जण, दहिगाव गावंडे येथील चार जण, गड्डम प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व रायखेड ता. तेल्हारा  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात  सहा महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील सहा जण, रिधोरा बाळापूर येथील तीन जण तर उर्वरित मोठी उमरी, मळसूर, जूने शहर, रामदास पेठ, शास्त्री नगर व जठारपेठ चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सिद्धार्थनगर, जूने शहर येथील 74 वर्षीय पुरुष असून तो दि. 13 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

64 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, कोविड केअर सेंटर येथून ३१ जण, ओझोन हॉस्पीटल येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथून सात जणांना अशा एकूण ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

394 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3290(2758+532)  आहे. त्यातील  137 जण मयत आहेत. स्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2759 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 394 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम