रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 262 चाचण्या, पाच पॉझिटिव्ह
अकोला,दि.1(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 262 चाचण्यामध्ये पाच
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले,
अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या
याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज येथे 120 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. अकोट, पातूर व बाळापूर
येथे चाचण्या झाल्या नाहीत. बार्शीटाकळी येथे
चार चाचण्या झाल्या त्यात
कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तेल्हारा येथे
26 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही. मुर्तिजापूर येथे 29 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. तसेच अकोला
मनपामध्ये 36 चाचण्या झाल्या त्यात चार पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्ह्यातील
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 39 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आठ
जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 262 चाचण्या होऊन त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 7790 चाचण्या झाल्या असून 372 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले
आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा