२५३ अहवाल प्राप्त; ६५ पॉझिटीव्ह, २५ डिस्चार्ज


अकोला,दि.३०(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २५३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८८ अहवाल निगेटीव्ह तर  ६५ अहवाल पॉझिटीव्ह आले. 
त्याच प्रमाणे काल (दि.२९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २८ तर खाजगी लॅब मध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३९४२ (३१५६+७१६+७०)  झाली आहे. आज दिवसभरात २५ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २७४९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६७८५, फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५३१ नमुने होते. आजपर्यंत एकूण २७३१७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २४१६१ तर पॉझिटीव्ह अहवाल  ३९४२ (३१५६+७१६+७०) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज ६५ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात ६५ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ६५  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात २६ महिला व ३९ पुरुष आहेत. त्यातील मोऱ्हाड ता. बार्शीटाकळी येथील १६ जण, सस्ती ता.पातूर येथील नऊ जण, मूर्तिजापूर येथील आठ जण, गोरक्षण रोड येथील पाच जण, डाबकी रोड येथील चार जण, पंचशील नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित वाडेगाव, राधाकिसन प्लॉट, आलेगाव ता. पातूर, कृषी नगर, निंबधे प्लॉट, पळसो बधे, सोनारी ता. मूर्तिजापूर, पिंजर,जुने खेतान नगर, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, सोंदाळा ता.  तेल्हारा व बटवाडी ता. बाळापूर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये २८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या चाचण्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

२५ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६ जणांना,कोविड केअर सेंटर येथून १४ जण, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर  येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण तर ओझोन हॉस्पीटल येथून दोन जण, अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
६२२ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ३९४२ (३१५६+७१६+७०) आहे. त्यातील  १५१ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  ३१६९  संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ६२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ