किटकनाशक विषबाधेचे निदान व उपचार या संदर्भात सोमवारी झूमव्दारे प्रशिक्षण

         अकोला,दि.22 (जिमाका)- अकोला जिल्ह्यात विविध पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना शेतकरी/शेतमंजूर यांना विषबाधा होण्याचे घटना समोर येत आहे. सदर विषबाधा झालेल्या व्यक्तीना अचूक उपचार होण्याच्या दृष्टिने सर्व शासकीय व खाजगी डॉक्टरांना विषबाधेवर उपचार करण्याकरीता एक दिवसीय झूम कॉलव्दारे सोमवार (दि.24) रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            या प्रशिक्षणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे राहतील. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी सिंजेंटाबद्दल ओळख याबाबतची माहिती हेड ऑफ सस्टेनेबल अंड रेस्पोंसिबल बिझनेस, सिंजेंटा इंडिया लिमिटेडचे  चिदंबरम फडणीस हे देतील.  या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हेड पॉयझन कंट्रोल सेंटर व अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स,  कोचिन, केरळाचे टॉक्सिकॉलॉजी कसल्टंट डॉ.  वी. वी. पिल्लाई हे राहतील. कार्यक्रमाचे प्रस्तावना बिझनेस सस्टानाबीलिटी हेड, सिंजेंटा इंडिया लिमिटेडचे  के. सी रवी करतील. यावेळी प्रश्नोत्तरे सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ