245 अहवाल प्राप्त; 13 पॉझिटीव्ह, 32 डिस्चार्ज, 1 मयत
अकोला,दि.2 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 245 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 232 अहवाल निगेटीव्ह तर 13 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2679(2313+366) झाली आहे. आज दिवसभरात 32 रुग्ण बरे झाले. आता 423 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20356 जणांचे नमुने
पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19779, फेरतपासणीचे
167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 410 नमुने होते. आजपर्यंत एकूण 20223 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 17910 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2679(2313+366) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा
रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 13
पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी
एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात एक
पुरुष असून ते सिंधी कॅम्प शास्त्री नगर, अकोला येथील रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 12
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सहा महिला
व सहा पुरुष आहेत. त्यात खांबोरा येथील चार जण, कापसी
येथील तीन जण तर जीएमसी हॉस्टेल, सिंधी कॅम्प, बोंदरखेड, पीकेव्ही व जूना शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे
रहिवासी आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
32 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 12 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून
12 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून पाच जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जणांना
अशा एकूण 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एक मयत
दरम्यान एकाचा
मृत्यू झाला. ते ८१ वर्षीय पुरुष असून ते बाळापूर रोड, अकोला
येथील रहिवासी होते. त्यांना
दि. २२ जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार
घेतांना मृत्यू झाला.
423 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची
संख्या 2679(2313+366) आहे. त्यातील जण 110 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण
व्यक्तींची 2146
संख्या आहे. तर सद्यस्थितीत 423 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा