३३१ अहवाल प्राप्त; २९ पॉझिटीव्ह, २६ डिस्चार्ज, तीन मयत


अकोला,दि.२९(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३०२ अहवाल निगेटीव्ह तर  २९ अहवाल पॉझिटीव्ह आले. 
त्याच प्रमाणे काल (दि.२८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १०  तर खाजगी लॅब मध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३८३६ (३०९१+६८८+५७)  झाली आहे. आज दिवसभरात २६ रुग्ण बरे झाले, तर तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २७२३४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २६५३१, फेरतपासणीचे १७६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ५२७  नमुने होते. आजपर्यंत एकूण २७०६४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २३९७३ तर पॉझिटीव्ह अहवाल ३८३६ (३०९१+६८८+५७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज २९ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरा २९ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नऊ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात काटखेड ता. बार्शी टाकळी येथील दोन, झोडगा ता. बार्शी टाकळी येथील दोन, मनबदा ता. तेल्हारा येथील दोन, निंभा ता. मुर्तिजापूर येथील दोन,  जीएमसी येथील दोन, निमवाडी येथील दोन, गणेश नगर  येथील दोन, तर शास्त्री नगर, काटेपूर्णा ता. अकोला, महसूल कॉलनी, सिंधी कॉलनी, जवाहरनगर, जठारपेठ, डाबकी रोड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, हातरुन ता. बाळापूर, पळसो ता. अकोला,  नायगाव, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात  तीन महिला असून त्या व्याळा येथील दोन तर कान्हेरी  येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या चाचण्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

तीन मयत
दरम्यान आज तीन जणाचा मृत्यू झाला. त्यात आज पहाटे अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दि. २५ रोजी दाखल झाली होती. तिचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. २० ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.  तर ओझोन हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला असून ते रामदास पेठ येथील ७६ वर्षीय पुरुष असून त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली.
२६ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर  येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून १० जण, अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
५४१  रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  ३८३६ (३०९१+६८८+५७) आहे. त्यातील  १५१ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  ३१४४  संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ५४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ