397 अहवाल प्राप्त; 27 पॉझिटीव्ह, 63 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.23 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 397 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 370 अहवाल निगेटीव्ह तर  27 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3468(2890+578) झाली आहे. आज दिवसभरात 63 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 25722 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 25047, फेरतपासणीचे 174 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  501  नमुने होते. आजपर्यंत एकूण 25585 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 22695 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3468(2890+578) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 27 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी २६  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 12 महिला व 14 पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर  येथील नऊ जण, चागेफळ व पाथर्डी ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, बेलखेड व अकोट येथील प्रतेकी दोन जण,   तर उर्वरित  जय हिंद चौक, खदान, म्हैसपुर,  राजराजेस्वर नगर, शिवसेना वसाहत, तळेगाव ता. तेल्हारा व तेल्हारा येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण पुरुष असून नायगाव, अकोला येथील  रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण कोकणवाडी, मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि. 18 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

63 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११ जणांना, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून पाच जणांना तर कोविड केअर सेंटर बाळापूर येथून सहा जणांना, अशा एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

320 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3468(2890+578) आहे. त्यातील  144 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3004 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 320 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ