अतिवृष्टीचा इशारा
अकोला,दि.4(जिमाका)- हवामान
विभाग, नागपूर
यांच्या संदेशानुसार शनिवार (दि.8
ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे
इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
काटेपुर्णा प्रकल्पामध्ये
मंगळवार (दि.4) रोजी सकाळी सात वा. 81.81 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास काटेपुर्णा
प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येईल तरी याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काठावरील गावांना
सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/
ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे
कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची
योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा