अनाथाच्या विकासासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री ना. बच्चू कडू

 



          अकोला
,दि.15 (जिमाका)- शासनाच्या विविध योजनेचे एकत्रीकरण करुन त्याचा लाभ अनाथ मुलाना देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

            आज माधव नगर येथील शासकीय मुलांचे निरिक्षण गृह व शासकीय मुलांचे बालगृह येथे भेट दिल्यावर त्यानी व्यक्त केली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी योगेश जवादे, बालगृहाचे अधीक्षक झुंबर जाधव, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष पलवी कुलकर्णी, सदस्य सुनीता कपीले, प्रीती वाघमारे, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. शिंगारे व घुगे उपस्थित होते.

            पालकमंत्री ना. कडू यांनी बालगृहाला भेट देवून तेथील मुलांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या. मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून शासनाचे विविध योजना एकत्रीकरण करुन त्यासंबंधीचा अहवाल त्वरीत सादर करावा. यासाठी शासन आपल्याला योग्य ते सर्व सहकार्य करेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील कल लक्षात घेता त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देवून स्पर्धा परिक्षा तसेच ज्यांना उद्योगाकडे वळाचे आहे, अशाना उद्योग करण्याचे शिक्षण द्यावे. अनाथाना योग्य शिक्षण तसेच सोयीसुविधा उपलब्ध करुन देवून येत्या काही वर्षात त्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्यांच्यावर योग्य संस्कार करावे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री ना. कडू यांची अकोला थॅलेसिमीया सोसायटीला भेट

            पालकमंत्री ना. कडू यांनी अकोला थॅलेसिमीया सोयायटी व डे केयर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीकिशन बाजोरिया,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, थॅलेसिमीया सोसायटीचे अध्यक्ष व माजी नगरध्यक्ष  हरिश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार, नुतन जैन, डॉ. विनीत वर्टे, डॉ. चंदन मोटवाणी होते.

            सामाजिक बांधीलकी समजून थॅलेसिमीयाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वानी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. कडू केले. अलीमचंदानी सारखे रंजल्या गाजल्याची सेवा करणारे व्यक्ती खरच समाजातील देव आहे. अशा व्यक्तीचा आदर्श ठेवून  समाजातील प्रत्येक व्यक्तीने थॅलेसिमीयासारख्या आजारासाठी सढळ हातानी सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. थॅलेसिमीया हा आजार अनूवंशीक आजार असल्यामुळे लग्न करताना कुंडली न बघता थॅलेसिमीयाची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. यामुळे समाजात थॅलेसिमीया आजाराचा फैलाव होणार नाही. यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान शिबीरास पालकमंत्री यांची भेट

            मेहरबानो महाविद्यालय येथे कावड पालखी उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला  पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत गोपाल खंडेलवाल, डॉ. अशोक ओळंबे, कमल खरारे, गोपाल नागपूरे, मनोज पाटील, ॲड. पपु मोरवाल, राजेश चव्हाण, गजानन रोकडे, श्रीकांत गावंडे, निखिल नाडे, सागर पाटील, जयराम पांडे तसेच शिवशक्त कावड पालखी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम