63 अहवाल प्राप्त; 19 पॉझिटीव्ह, 63 डिस्चार्ज, 2 मयत
अकोला,दि.3 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 63 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 44 अहवाल निगेटीव्ह तर 19 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2698(2332+366) झाली आहे. आज दिवसभरात 63 रुग्ण बरे झाले. आता 377 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20417 जणांचे नमुने
पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19834, फेरतपासणीचे
167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 416 नमुने होते. आजपर्यंत एकूण 20286 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 17954 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2698(2332+366)आहेत,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
आज 19
पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 19
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात
महिला व 12 पुरुष आहेत. त्यात रेणुका नगर, अकोला येथील चार जण, बाबुळगाव अकोला येथील तीन जण तर उर्वरित कापसी, उमरी, सिव्हिल लाईन, घोडेगाव तेल्हारा, सहकार नगर, सुवर्णा नगर, पी एस मुख्यालय,
मूर्तिजापूर, लोहारा बाळापूर, डाबकी रोड, खदान व जवाहर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी
आहेत. तसेच आज सायंकाळी कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह
आला नाही, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
63 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 44 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 14 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून एक
जणांना, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून दोन जणांना अशा एकूण 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
दोन मयत
दरम्यान
दोघांचे मृत्यू झाले. त्यात 70 वर्षीय पुरुष असून ते
दाळंबी अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. दोन ऑगस्ट रोजी दाखल झाले होते.
त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच 51 वर्षीय पुरुष असून ते लोहारा, बाळापूर येथील
रहिवासी आहे. त्यांना दि. एक ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना
मृत्यू झाला
377 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2698(2332+366) आहे.
त्यातील जण 112 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण
व्यक्तींची 2209
संख्या आहे. तर सद्यस्थितीत 377 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा