विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

 



        अकोला,दि.21(जिमाका)- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत आज सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला.

        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार आदी उपस्थित होते.

        यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ या संदर्भात आढावा घेतला. ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहे अशा ठिकाणी सर्वेक्षण करुन कोरोना चाचण्या घेण्याचेही निर्देश दिले.  जिल्ह्यातील सार्स रुग्णाची शोध घेवून त्यांच्या कोरोना चाचण्या करुन घ्या. तसेच ज्या क्षेत्रात अधिक रुग्ण संख्या आहे तेथे, जादा संख्येने चाचण्या केल्या जाव्या. यासाठी भरारी पथक तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या ही कमी येत असल्याबाबत त्यानी समाधान व्यक्त केले परंतु मृत्यूदर कायम असल्याचे सांगून चिंताही व्यक्त केली. अतिधोक्याच्या रुग्णाना प्लॉझमा थेरपी देवून मृत्यू दर कमी करण्याचे सूचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्यात. प्रतिबंधीत क्षेत्रातील संदिग्ध लोकांच्या तपासण्या पूर्ण करा.  चाचण्या कोणाच्या कराव्या, याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावे,असे निर्देश दिले. तसेच उपलब्धतेबाबत आढावा घेऊन आवश्यकता भासत असल्यास त्वरीत मागणी नोंदविण्याची सुचना केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ