218 अहवाल प्राप्त; 19 पॉझिटीव्ह, 35 डिस्चार्ज, तीन मयत

 

अकोला,दि.15 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 218 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 199 अहवाल निगेटीव्ह तर  19 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3227(2610+517) झाली आहे. आज दिवसभरात 35 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 23796 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23155, फेरतपासणीचे 170 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  471  नमुने होते. आजपर्यंत एकूण 23697 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 20987  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3227(2610+517) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 19 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व 13 पुरुष आहेत. त्यातील दहीगाव गावंडे येथील तीन जण, शिवनी, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, कृषि नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित जोगेश्वर प्लॉट, हिंगणा रोड अकोला, नानकनगर निमवाडी, देशमुख फाईल, अकोट, तेल्हारा व हिवरखेड तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या महिला असून खडकी, अकोला येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

 

तीन मयत

दरम्यान आज तीन जणाचा मृत्यू झाला. त्यात जूनी वस्ती, मुर्तिजापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि. ९ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, न्यू राधाकिसन प्लॉट, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष असून तो दि.५ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच वाल्मीक नगर, अकोट  येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. १४ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

35 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 18 जणांना, कोविड केअर सेंटर येथून 11 जण व आयकॉन हॉस्पीटल येथून सहा जणांना अशा एकूण 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

459 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3227(2610+517) आहे. त्यातील  134 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2634 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 459 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम