रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १९८ चाचण्या, १० पॉझिटिव्ह

 अकोला,दि.२८ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १९८ चाचण्या झाल्या त्यात  १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे २४ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोट येथे ५५ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बार्शी टाकळी येथे १३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यातही कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. मुर्तिजापूर येथे एक चाचणी झाली त्यात कुणी पॉझिटीव्ह आले नाही. अकोला मनपा येथे ४८ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे १२ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर ४२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. असे दिवसभरात १९८ चाचण्यांमध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.तर आजपर्यंत १२२७१ चाचण्या झाल्या त्यात ६९३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन