रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात २०१ चाचण्या,३१ पॉझिटिव्ह

 अकोला,दि.२७ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या २०१ चाचण्या झाल्या त्यात  ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोट, बार्शीटाकळी, पातूर येथे चाचण्या झाला नाही तर अकोला ग्रामिण येथे २६ चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापुर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तेल्हारा येथे ५० चाचण्या झाल्यात त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मुर्तिजापूर येथे ४१ चाचण्या झाल्या त्यात १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच अकोला मनपा क्षेत्रात ४८ चाचण्या झाल्या त्यात चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे सात चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या १८ चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशा दिवसभरात २०१ चाचण्या होऊन ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर आजपर्यंत १२०७३ चाचण्या झाल्या त्यात ६८३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत , असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन