अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण

 

अकोला,दि.14 (जिमाका)- स्वातंत्र्य दिनाचे ऑचित्य साधत जिल्ह्यातील अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना विशेष सहाय्य योजनेच्या लाभाचे वितरण पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य सभारंभानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

          यावेळी अकोला तालुक्यातील आनंद आश्रम, गुडधी, सुर्योदय बालगृह मलकापुर, गायत्री बालिकाश्रम, मलकापूर येथील 11 बालक तसेच सात दुर्धर आजारग्रस्त बालकांना या लाभांचे वितरण केले जाणार आहे, असे संजय गांधी निराधार योजना शाखा, अकोला तहसिलदार कार्यालय, अकोला यांनी कळविले आहे.


              स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 73 वा वर्धापन  आज (दि.15)  रोजी  सकाळी 9 वा. 5 मि. वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  ध्वजारोहण होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ