लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात दाखल करावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची संयुक्त बैठक

         अकोला,दि.12 (जिमाका)- कोविड-19 चे लक्षणे दिसून येताच घरी वेळ न घालवता रुग्णाने तात्काळ घसातील स्त्रावाची तपासणीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायकांनी रुग्णामध्ये कोविडचे लक्षणे आढळताच रुग्णाबाबत महानगरपालिका किवा आरोग्य विभागात सूचना द्यावी. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे योग्य पध्दतीने उपचार झाल्यामुळे कोविड रुग्णाची  प्रकृती गंभीर न होता तो बरा होवून  मृत्यू दर कमी होईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी सांगितले.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 मृत्यू परिक्षणबाबतची शासकीय  महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवार (दि.10) रोजी संपन्न झाली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. कुसमाकर घोरपडे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. प्रदीप उमप, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. अनिल बत्रा, डॉ. संजय वाघ व  डॉ. दिलीप सराटे उपस्थिती होती.

            दि. 31 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीतील कोविड रुग्णांचा झालेल्या मृत्यूच्या वैद्यकीय कारणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कालावधीत 14 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 12 पुरुष व दोन महिलाचा समावेश आहे. त्यापैकी पाच रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात झाले होते. 10 रुग्णांना अगोदरच कोविड व्यतिरिक्त इतर आजार जसे मधुमेह, उच्च्‍ा रक्तदाब किंवा मुत्रपिंडाचे आजार असल्याचे निर्दशनास आले तर नऊ रुग्ण हे 60 वर्षावरील होते.

            रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी या सर्वाना एचआरसीटी वर फुफ्फुसाचे पाच ते सहा लोब खराब झाल्याचे दिसुन आले. त्याच प्रमाणे शरिरातील मुत्रपिंड व स्वादुपिंड या सारखे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत नसल्याचे आढळले. अशा अवस्थेमध्ये रुग्ण औषधोपचारास योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. यावेळी फुफ्फुस व इतर अवयव बऱ्याच अंशी निकामी झाल्याने रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर झालेली असते.  14 पैकी पाच रुग्ण लक्षणे सुरु झाल्यांनतरही घरी किवा स्थानिक वैद्यकीय व्यवसायिकांकडून उपचार घेत राहीले. यांचा कालावधी हा 5 दिवसापेक्षा जास्त होता. रुग्णालयात दाखल होण्याकरीता झालेल्या विलंबामुळे या रुग्णांमध्ये कोविड-19 हा आजार बळावला होता व महत्चाच्या अवयवांवर याचा गंभीर परिणाम झाला होता आणि शरिरातील महत्वाचे अवयव निकामी होऊन मृत्यू झाला.

            कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले की, कोविड-19 ची लक्षणे दिसुन येताच घरी वेळ न घालवता रुग्णाने तात्काळ घशातील स्त्रावाची तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, दोन रुग्णांनी खाजगी दवाखान्यात औषधोपचार घेतला होता नंतर श्वसनक्रिया खालावली असतांना सर्वोपचार रुग्णालयामध्ये धाव घेतली होती तोपर्यंत त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते. तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी रुग्णामध्ये कोविड लक्षणे आढळताच संबंधित रुग्णाबाबत महानगरपालिकेस सूचना द्यावीत, जेणेकरुन रुग्ण गंभीर न होता लगेच शासकीय रुग्णालयात दाखल होईल व पुढील योग्य पद्धतीने उपचार सुरु होतील मृत्यूदर कमी होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ