जिल्ह्यात पान टपरीवर तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री सुरु करण्यास अटी शर्तींसह परवानगी


अकोला,दि.22 (जिमाका)- तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्री करण्याऱ्या दुकाने व पानटपऱ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सकाळी 9 ते सायं. 7 पर्यंत सुरु करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.


            शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थास बंदी घातली आहे ते पदार्थ विक्री करण्यास किंवा विक्री करण्यासाठी ठेवण्यास संपूर्ण बंदी असेल. तथापि,ज्या पदार्थांना बंदी नाही असे पदार्थ विक्री करतांना विक्री करणारे दुकानदार व ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमालचा वापर तसेच सामाजिक अंतराच्या (Social Distancing ) नियमांचे पालन करावे.अशा ठिकाणी दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखतील तसेच दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करतेवेळी दुकानदाऱ्यांनी दोन ग्राहकांमध्ये सूरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसे आढळून न आल्यास याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे विभाग, महसूल, पोलीस विभागानी दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असून  पानटपरी अथवा दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांनी धुम्रपान केल्यास अथवा थुंकल्यास संबंधित दुकानदारावर तसेच ग्राहकांवर सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत दंडात्मक व कायदेशिर कारवाई केली जाईल. पानटपरी किवा दुकानांच्या ठिकाणी फक्त तंबाखुजन्य पदार्थ विक्रीस मुभा राहील. तथापि अशा ठिकाणी असे पदार्थ सेवन करणे अनुज्ञेय राहणार नाही. पानटपरी किंवा दुकानांच्या ठिकाणी व कामगारासाठी असणाऱ्या एकत्र सुविधांचे ठिकाणी व सर्व मानवी संपर्क येण्याच्या ठिकाणी उदा. दरवाजे हेन्डल इत्यादी स्वच्छ व संनिटाईज करण्यात यावीत. 


            अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1850 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक पेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशास पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात आलेले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान या संदर्भात या व्यवसायातील अनेक विक्रेत्यांनी पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार, पालकमंत्री ना.कडू यांनी प्रशासनास निर्देश दिले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ