अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण

           अकोला,दि.15 (जिमाका)- स्वातंत्र्य दिनाचे ऑचित्य साधत जिल्ह्यातील अनाथ व दुर्धर आजारग्रस्त बालकांना विशेष सहाय्य योजनेच्या लाभाच्या अनुदानाचे वितरण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य सभारंभानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम झाला.

               या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व महिला व बाल विकास अधिकारी योगेश जवादे यांची उपस्थिती होती.

          यावेळी अकोला तालुक्यातील आनंद आश्रम, गुडधी, सुर्योदय बालगृह मलकापुर, गायत्री बालिकाश्रम, मलकापूर येथील 11 बालक तसेच सात दुर्धर आजारग्रस्त बालकांना या लाभांचे वितरण करण्यात आले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ