रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 201 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

 अकोला,दि.20 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 201 चाचण्यामध्ये  तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 52 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर  येथे 50 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे 50 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी  39 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 201 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 11056 चाचण्या झाल्या असून 573  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ