39 अहवाल प्राप्त; 7 पॉझिटीव्ह, 34 डिस्चार्ज, 1 मयत
अकोला,दि.
4 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 39 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 32 अहवाल निगेटीव्ह तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2708(2339+369) झाली आहे. आज दिवसभरात 34 रुग्ण बरे झाले. आता 352 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20433 जणांचे नमुने
पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19850, फेरतपासणीचे
167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 416 नमुने होते. आजपर्यंत एकूण 20325 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 17986 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2708(2339+369)आहेत,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
आज सात
पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी
सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित जूने शहर, वाडेगाव, कौलखेड, न्यू राधाकिसन प्लॉट व
डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला
नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
34 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 26 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन जणांना, कोविड
रुग्णालय मुर्तिजापूर येथून तीन जणांना तर हॉटेल
रेजेन्सी येथून तीन जणांना अशा एकूण 34 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयातून देण्यात आली आहे.
एक मयत
दरम्यान एकाचा
मृत्यू झाला. त्यात 50 वर्षीय पुरुष असून ते मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 31 जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
352 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची
संख्या 2708(2339+369) आहे. त्यातील जण 113 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण
व्यक्तींची 2234
संख्या आहे. तर सद्यस्थितीत 352 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा