रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 136 चाचण्या,13 पॉझिटिव्ह

 


अकोला,दि.31 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 136  चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोट येथे 37 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  बार्शीटाकळी येथे दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तेल्हारा येथे एक चाचणी झाली त्यात  कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.  तर अकोला मनपा येथे 54 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात 136 चाचण्यांमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 12707 चाचण्या झाल्या त्यात 743 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ