रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 165 चाचण्या, 24 पॉझिटिव्ह
अकोला,दि.24 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 165 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे
यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर, मुर्तिजापूर व तेल्हारा
येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 40 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी
येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तसेच अकोला मनपा येथे 89 चाचण्या झाल्या त्यात 15
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 19 चाचण्या झाल्या
त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय
कर्मचाऱ्यांपैकी पाच जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे चाचण्या झाल्या नाही, अशा प्रकारे दिवसभरात 165 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 11567 चाचण्या झाल्या असून 614 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा