267 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, 34 डिस्चार्ज, दोन मयत
अकोला,दि.21 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 267 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 237 अहवाल निगेटीव्ह तर 30 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3388(2820+568) झाली
आहे. आज दिवसभरात 34 रुग्ण बरे झाले,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 24772 जणांचे नमुने
पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 24103, फेरतपासणीचे
173 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 496 नमुने होते. आजपर्यंत एकूण 24657 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21837 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3388(2820+568) आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 30 पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी
दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन पुरुष
असून ते नेहरु पार्क व कापसी अकोला येथील रहिवासी आहेत. तसेच
आज सायंकाळी 28 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात
13 महिला व 15
पुरुष आहेत. त्यातील वाडेगाव
येथील 10 जण, आपातापा व जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, व्याळा, मुर्तिजापूर,
खदान येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित लक्ष्मी नगर, लोहारा, नकाषी, जीएमसी, डाबकी रोड व
तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये
तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह
अहवाल संख्येत करण्यात आला आहे.
दोन मयत
दरम्यान
आज दोन जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर नाका, जूने
शहर, अकोला येथील 74 वर्षीय पुरुष असून तो दि.
19 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा
उपचार घेतांना मृत्यू झाला. तर म्हैसपूर, ता.बार्शीटाकळी येथील 42 वर्षीय
महिला असून ती 17 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
34
जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11 जणांना, कोविड केअर सेंटर येथून आठ जण, आयकॉन हॉस्पीटल
येथून 11 जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, कोविड केअर सेंटर,
हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक जण, कोविड केअर सेंटर,
बालापूर येथून एक जण तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक
जणांना अशा एकूण 34 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात
आली आहे.
331 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची
संख्या 3388(2820+568) आहे. त्यातील 143 जण मयत आहेत. स्चार्ज
दिलेल्या एकूण व्यक्तींची 2924 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 331 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा