104 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 22 डिस्चार्ज, एक मयत

 

अकोला,दि.16 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 104 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 90 अहवाल निगेटीव्ह तर  14 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3242(2724+518) झाली आहे. आज दिवसभरात 22 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 23909 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23264 फेरतपासणीचे 170 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  475  नमुने होते. आजपर्यंत एकूण 23801 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21077 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3242(2724+518) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 14 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  सहा महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर   येथील नऊ जण, बार्शी टाकळी येथील दोन जण तर उर्वरित वाडेगाव, कृषी नगर व बोरगांव मंजु  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. शिवसेना वसाहत, जुने शहर, अकोला येथील ५० वर्षीय महिला असून ती दि. १० ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. तिचा  उपचार घेतांना मृत्यू झाला.

22 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११  जणांना, कोविड केअर सेंटर येथून चार जण,  हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण तर हॉटेल रणजित येथून पाच जणांना, अशा एकूण २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

451 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3242(2724+518) आहे. त्यातील  135 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2656 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 451 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम