433 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 10 डिस्चार्ज

 


 

अकोला,दि.10 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 433 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 400 अहवाल निगेटीव्ह तर  33 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3053(2577+476) झाली आहे. आज दिवसभरात 10 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 512 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 22186 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 21584, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  433  नमुने होते. आजपर्यंत एकूण 22059 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 19482  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3053(2577+476) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 33 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व 26 पुरुष आहेत. त्यातील पुनोती बार्शीटाकळी येथील सहा जण,रिधोरा येथील चार जण, अकोट, जठारपेठ, हिवरखेड येथील प्रत्येकी तीन जण, बार्शीटाकळी येथील दोन जण तर उर्वरित शिवणी, गौरक्षण रोड, गिता नगर, केळकर हॉस्पीटल, सुधीर कॉलनी, मोठी उमरी, माना, पातूर, सिव्हील लाईन, पिंपरी ता अकोट, दहिगाव गावंडे ता.अकोला व वाल्पी ता.बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

10 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, ओझोन हॉस्पीटल व ऑयकॉन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक जण, तर हॉटेल रेजेन्सी येथून पाच जणांना अशा एकूण 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

 

512 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3053(2577+476) आहे. त्यातील  116 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2425 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 512 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा