रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 202 चाचण्या, 33 पॉझिटिव्ह


अकोला,दि.25 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 202 चाचण्या झाल्या त्यात  33 जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोला ग्रामीण येथे 15 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अकोट येथे 23 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बार्शीटाकळी येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 15 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच अकोला मनपा येथे 88 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 23 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 26 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 202 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 11769 चाचण्या झाल्या असून 647 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ