तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर; निवड यादीतील उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर; निवड यादीतील उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अकोला, दि. 30 : तलाठी पदभरतीसाठी निवड यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड यादीतील उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्याचा निकाल जिल्हा प्रशासनाच्या akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र तपासणीला हजर राहावे. ऑनलाईन अर्जाची प्रत, आधारपत्र, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅनकार्ड, वाहन परवाना, तसेच ऑनलाईन अर्जात नमूद केलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीचा एक संच आणि पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रांसह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ