पशुधनाचे टॅगिंग करून घेण्याबाबत आवाहन

 पशुधनाचे टॅगिंग करून घेण्याबाबत आवाहन

अकोला, दि. 29 : दुग्ध उत्पादक शेतक-यांना दूधासाठी प्रतिलिटर पाच रू. अनुदान दिले जाते. त्यासाठी पशुधनाचे टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीत नोंदणी आवश्यक आहे. पशुपालक व शेतकरी बांधवांनी पशुधनास टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

 

पशुधनाचे टॅगिंग व ऑनलाईन नोंदणीसाठी अभियान राबविण्याची सूचना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यानुसार सर्व पशुवैद्यकीय संस्थांमध्ये टॅगिंग व नोंदणी सुरू आहे. पशुपालक बांधवांनी पशुधनाला टॅगिंगचे काम पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ