'पीएम किसान सन्मान निधी' योजनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी संपृक्तता मोहीम

 

'पीएम किसान सन्मान निधी' योजनेचे

उद्दिष्ट गाठण्यासाठी संपृक्तता मोहीम

 

  अकोला, दि. २ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र व्यक्तींना करून देण्यासाठी गावपातळीवर संपृक्तता मोहिम राबविण्यात येत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित १६ वा हप्ता वितरित करण्यापूर्वी ही संपृक्तता मोहिम गावपातळीवर राबवत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी आज सांगितले.

     ते म्हणाले, जिल्ह्यात दि. ६  डिसेंबर २०२३  पर्यन्त १ लाख ९० हजार ६४८ शेतकरी कुटुंबांनी नोंदणी केलेली असून त्यापैकी जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे याकरिता एकूण १४ हजार ४२१ लाभार्थी प्रलंबित आहेत. पीएम किसान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पीएम किसान पोर्टल व मोबाईल ॲपची सुविधा विकसित केली आहे. या सुविधांचा वापर करून पात्र शेतकरी कुटुंबाचे स्वयंनोंदणी व मोबाइल, पोर्टल किंवा चेह-यावरून प्रमाणित करणा-या ॲपद्वारे ई-केवायसीची पूर्तता करणे सोपे झाले  आहे.

सामाईक सुविधा केद्रांद्वारे लाभार्थीची स्वयंनोंदणी व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे व इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडून ते आधार संलग्न करणे या सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

   पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित  व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक  यांच्याशी संपर्क साधून  विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून जानेवारी २०२४ मध्ये वितरित होणार्‍या १६ व्या हप्त्याच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असे असे आवाहन त्यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ