दुग्ध उत्पादकांसाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान

 

दुग्ध उत्पादकांसाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान

सहकारी दुध संघ व खासगी प्रकल्पांनी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला दि. 12 : सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी या अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या लाभासाठी आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यासह दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tag) संलग्न करणे आवश्यक आहे. योजनेत सहकारी दुध संघास, तसेच खाजगी प्रकल्पास दुध पुरवठा करणारे शेतकरी सहकारी संघ, खाजगी प्रकल्पामार्फत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत राहील. इच्छूक संघांनी आपला स्वतंत्र अर्ज  ddcmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. आर. एम. चव्हाण यांनी केले आहे.

000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ