मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सुरूवात

 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सुरूवात

अकोला, दि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेत सन 2021-22 व 2022-23 वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 केंद्र शासनाकडून 60 टक्के रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास 7 दिवसांच्या आत आत जमा करावयाची आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत जमा होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या रकमेमधून निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त एम.डब्ल्यू. मून यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ