बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

 

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

 

अकोला, दि. 5 : जिल्ह्यात दि. 27 डिसेंबर ते 5 जानेवारीदरम्यान 87 आरटीपीसीआर व 1 हजार 663 अशा एकूण 1 हजार 750कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तसेच डॉ. हेडगेवार प्रयोगशाळा येथे आज 9 आरटीपीसीआर व जिल्ह्यात एकूण 114 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. त्यात एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला.

हा रूग्ण बार्शीटाकळी तालुक्यातील असून, खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. यापूर्वी आढळलेले चार रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यात सक्रिय रूग्णांची संख्या 5 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली.            

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित नजिकच्या संस्थेत तपासणी करून घेणे आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ