ज्वारी , बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू

 ज्वारी , बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू

अकोला, दि. 2 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमी भावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मका पीकांसाठी ऑनलाईन नोंदणी १५ जानेवारीपर्यंत सुरू आहे.

जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर येथील खरेदी केंद्रावर दि. 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता मुदतवाढ दिलेली आहे. संकरित ज्वारी हायब्रिड 3 हजार 180 रू., मालदांडी ज्वारीसाठी 3 हजार 225 रू. मक्यासाठी 2090 रू. बाजरीसाठी 2 हजार 500 रू. हमीभाव आहे.

शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी शेतकऱ्यांचा पीकाची नोंद असलेला सातबारा, आधारलिंक असलेला बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्डाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांचा स्वत:चा फोटो घेणे बंधनकारक आहे. पेमेंट प्रणाली पीएफएमएस असून, आधारलिंक असलेले बँक खाते असावे, संयुक्त बँक खाते घेता येणार नाही.

ज्वारी, मका, बाजरी उत्पादक शेतकरी बांधवांनी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा