प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र व्यक्तींनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी कृषी विभागाचे आवाहन

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

पात्र व्यक्तींनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी

कृषी विभागाचे आवाहन

अकोला, दि. 9 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र व्यक्तींना करून देण्यासाठी गावपातळीवर मोहिम राबविण्यात येत असून, शेतकरी बांधवांनी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.    

 

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी   योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पतीपत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) दोन हजार रु. प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रू. लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ईकेवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

लाभार्थींची स्वयं नोंदणी व ईकेवायसीसाठी सर्व सामाईक सुविधा केंद्र  तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थींनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे, ईकेवायसी  बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र  व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मार्फत कार्यपूर्तता करावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीय नोडल अधिकारी / कृषी सहाय्यक यांची मदत घ्यावी.

पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्या वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 16 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी. एम. किसान योजनेच्या निकषांच्या अधिन राहून योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.  

   000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ