जिल्ह्यात सध्या कोरोनाचे दोन सक्रिय रूग्ण

 

जिल्ह्यात सध्या कोरोनाचे दोन सक्रिय रूग्ण

अकोला, दि. 6 : जिल्ह्यात दि. 27 डिसेंबर ते 6 जानेवारीदरम्यान 92 आरटीपीसीआर व 1 हजार 768 अशा एकूण 1 हजार 860 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात एकही कोरोनाबाधित आढळला नाही.

त्यात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 5 आरटीपीसीआर व जिल्ह्यात एकूण 90 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात दोन सक्रिय रूग्ण असून, आधीच्या तीन रूग्णांनी आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.

दोन सक्रिय रूग्णांपैकी एकजण मंगरूळपीर तालुक्यात असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दुसरा रूग्ण बार्शिटाकळी तालुक्यातील असून अकोल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे.

 नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित नजिकच्या संस्थेत तपासणी करून घेणे आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ