लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावा - व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावा

-         व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे

अकोला, दि. 30 :  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून  मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबांच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांनी येथे केले.

महामंडळाचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवारी जि. प. कर्मचारीभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, अधिकारी- कर्मचारी व मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. सांगळे म्हणाले की, मातंग व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक उन्नती, तसेच रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी  महामंडळाकडून सुविधा कर्ज योजना, महिला समृद्ध योजना, शैक्षणिक कर्ज योजना, थेट कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना आदी अनेक योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा. श्री. म्हस्के यांनी विविध योजनांची माहिती यावेळी दिली. ए. वाय. वाडिवे यांनी सूत्रसंचालन केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ