दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’

 

दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’

 

अकोला, दि. 1 : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

            गरजू दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात  आले आहे. दिव्यांग व्यक्तींना https://evehicleform.mshfdc.co.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज दि. ४ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ