वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन

 

वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी

अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 1 : केंद्रवर्ती अर्थसंकल्पा्‌च्या आराखड्यानुसार वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे दि. 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांत 85 टक्के अनुदानावर काटेरी तार, खाद्य स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, ताडपत्री, वनहक्क जमीनप्राप्त शेतकऱ्यांसाठी तार जाळी, ताडपत्री आदी, तसेच आदिवासी महिला व पुरूष बचत गटांसाठी रेडीमेड होजिअरी गारमेंट आदी बाबी पुरवल्या जातात. या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जासह अनुसूचित जमातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी. लक्ष्यांक, निधी व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता विचारात घेऊन निवड केली जाईल, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ