जिल्ह्यातील शेतक-यांना देशाबाहेर अभ्यास दौ-यात सहभागी होण्याची संधी

 

जिल्ह्यातील शेतक-यांना देशाबाहेर अभ्यास दौ-यात सहभागी होण्याची संधी

अकोला, दि. 30 : विविध देशातील विकसित शेती तंत्रज्ञानाबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा व क्षेत्रीय भेटीतून शेतक-यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यंदा या योजनेसाठी जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, न्यूझीलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. अभ्यास दौ-यासाठी शेतक-याचा चालू कालावधीचा सातबारा व आठ अ असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे. शेतकरी कुटुंबातून एकालाच लाभ घेता येईल. आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा, तसे प्रमाणपत्र जोडावे. सहलीला निघण्याच्या आधी वय 25 वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शेतकरी पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. त्याची मुदतीचा उल्लेख असलेली प्रत जोडावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी, संस्थेत नोकरीत नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, कंत्राटदार आदी नसावा. शेतक-याने यापूर्वी शासकीय, केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही विभागातील, कृषी विद्यापीठातर्फे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अर्थसाह्याने परदेश दौरा केलेला नसावा. दौ-यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.  

दौ-यासाठी शेतक-यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रू. यापैकी कमी असेल ती अनुदान म्हणून देय आहे. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ