यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

अकोला, दि. ४ : राज्य शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हा राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयाने केले आहे.  

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मितीसाठी  राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजने’त विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार दिले जातात. वर्ष 2023 मध्ये प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके पुरस्कारासाठी पाठविता येणार आहेत.

एकूण 4 विभाग, 35 साहित्य प्रकार आणि 29 लाख रूपयांचा पुरस्कार

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रूपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.बाल वाङ्मय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण 6 साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे. लेखक व प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

प्रवेशिका पूर्णत: भरुन पुस्तकांच्या दोन प्रतींसह जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे किंवा थेटपणे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात (रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोडप्रभादेवी, मुंबई 400025) येथे दि.  31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नवीन संदेश’ या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.  

 

 

0000000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ