गृहोपयोगी संचाबाबतचा ‘तो’ संदेश खोटा कामगारांनी आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

 

गृहोपयोगी संचाबाबतचा ‘तो’ संदेश खोटा

कामगारांनी आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

अकोला, दि. 23 : बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच (भांड्यांचा सेट ) मिळेल अशा आशयाची दिशाभूल करणारी जाहिरात व संदेश काही व्यक्तींकडून व्हाटसॲप व इतर माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे कामगारांनी आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक तसेच कल्याणकारी योजना राबविताना कामगारांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. कामगारांचे विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतात. गृहोपयोगी कोणत्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही प्रकारचे रकमेचे व्यवहार करू नये. पैश्याची मागणी करणा-या व्यक्ती, संघटना, त्रयस्थ व्यक्तीविरूध्द नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. गुल्हाने यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ